Edition

ईश्वरपूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; हरवलेली एक तोळ्याची सोन्याची चेन शोधून मालकास केली परत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी ईश्वरपूरच्या बाजारपेठेत आलेल्या महिलेच्या नातवाची हरवलेली एक तोळ्याची सोन्याची चेन शोधून ती परत करण्यात ईश्वरपूर पोलिसांना यश आले. पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी मनीषा बापू क्षीरसागर (रा. ताकारी) या दिवाळीच्या खरेदीसाठी ईश्वरपूर येथील बाजारपेठेत आल्या होत्या. यावेळी त्यांच्या नातवाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन बाजारपेठेत हरवली होती.
या घटनेची दखल घेत ईश्वरपूर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे चेनचा शोध सुरू केला. पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे हरवलेली सोन्याची चेन शोधून काढण्यात यश आले. त्यानंतर सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी ही चेन मनीषा क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
हरवलेली मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्याने क्षीरसागर यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक संदीप पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कुबेर खोत, पोलीस कर्मचारी दीपक घस्ते, विशाल पांगे, अमोल सावंत, शशिकांत शिंदे तसेच महिला पोलीस अंमलदार यांनी केली.
ईश्वरपूर पोलिसांच्या या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीचे नागरिकांतून अभिनंदन होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

₹४० हजारांच्या कर्जासाठी पोलिस कॉन्स्टेबलला ब्लॅकमेलिंगचा जाच; अखेर आयुष्य संपवलं! बेकायदेशीर लोन ॲप ऑपरेटरकडून पत्नीचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी; हैदराबादमधील धक्कादायक घटना

पोलिस कर्मचाऱ्यांना शिक्षेविरोधात आता एकदाच अपील करता येणार! दुसऱ्यांदा दाद मागण्याचा मार्ग बंद; थेट ‘मॅट’मध्ये जावे लागणार महाराष्ट्र पोलिस दलाचे नवे परिपत्रक; विभागीय अपील प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल, प्रलंबित प्रकरणे कमी करण्याचा प्रयत्न

traffic tail

error: Content is protected !!