नवी दिल्ली : जगभरातील Facebook वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Meta कंपनीने Facebook वरील अतिरिक्त (Additional) प्रोफाइल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 14 डिसेंबर 2026 नंतर एकाच अकाउंटअंतर्गत तयार केलेली अतिरिक्त प्रोफाइल्स कायमस्वरूपी हटवली जाणार आहेत. Meta ने 12 नोव्हेंबर रोजी आपल्या अधिकृत Newsroom मध्ये याबाबत माहिती दिली आहे.
नेमका कोणत्या प्रोफाइलवर परिणाम होणार?
Facebook वर मुख्य प्रोफाइलसोबत एकाच लॉगिनद्वारे तयार केलेली अतिरिक्त प्रोफाइल्स या निर्णयाच्या कक्षेत येणार आहेत.
मुख्य Facebook प्रोफाइल सुरक्षित राहणार आहे.
अतिरिक्त प्रोफाइल्स कायमची हटवली जाणार आहेत.
Facebook Pages वर या निर्णयाचा परिणाम होणार नाही.
स्वतंत्र ई-मेल आणि पासवर्ड असलेली स्वतंत्र Facebook खाती या निर्णयात समाविष्ट नाहीत.










