Edition

सरकारी शाळा वाचवा, नाहीतर रस्त्यावर उतरू – करवेचा इशारा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चिकोडी :* राज्य सरकारकडून सरकारी शाळा खाजगी संस्थांना किंवा शिक्षण माफियांना देण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर आरोप करत करवेचे चिकोडी तालुकाध्यक्ष संजू बडीगेर यांनी संताप व्यक्त केला आहे.

सध्या सुरू असलेला हा प्रकार म्हणजे कोणतीही शिक्षण सुधारणा नसून, सरकारी मालमत्ता आणि जमिनी खाजगी हितसंबंधांच्या लुटणीसाठी चालवलेला एक सुनियोजित डाव आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे.

सरकारकडून सरकारी शाळांना योग्य मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत आणि शिक्षकांची रिक्त पदे भरली जात नाहीत, यामुळेच सरकार जाणीवपूर्वक शाळा बंद पडण्याच्या स्थितीपर्यंत आणून ठेवत आहे, अशी टीका त्यांनी केली.

सरकारी शाळा खाजगी संस्थांच्या घशात घालण्याचा हा मनसुबा सरकारने तात्काळ थांबवावा. ग्रामीण भागातील सरकारी शाळा बळकट करून त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवावे, असे बडीगेर यांनी म्हटले आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर उग्र लढा उभारला जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी दिला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

“कारदगा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दत्तकुमार पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा..! “कार्यकर्त्यांचा एकमुखी सूर; ‘दत्तकुमार पाटील यांनीच निवडणूक लढवावी’ अशी मागणी, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे दत्तकुमार पाटील यांचे स्पष्ट मत”..!

traffic tail

error: Content is protected !!