Edition

“कारदगा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दत्तकुमार पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा..! “कार्यकर्त्यांचा एकमुखी सूर; ‘दत्तकुमार पाटील यांनीच निवडणूक लढवावी’ अशी मागणी, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे दत्तकुमार पाटील यांचे स्पष्ट मत”..!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

राजू संकपाळ / शमणेवाडी…

आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारदगा जिल्हा पंचायत मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. या मतदारसंघातून बेडकीहाळचे ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील यांनी काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवावी, अशी मागणी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागली आहे. दिवाळी फराळाच्या निमित्ताने बेडकीहाळ येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत दत्तकुमार पाटील यांच्या नावावर चर्चा रंगली असून, कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

“स्वर्गीय माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा तसेच स्वर्गीय ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील यांच्या लोकप्रियतेचा कारदगा परिसरावर आजही प्रभाव असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या कार्याशी कौटुंबिक नाते जोडलेले असलेले दत्तकुमार पाटील हे काकासाहेब पाटील यांचे जावई आणि गोपाळदादा पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर विशेष महत्त्व दिले जात आहे.

दत्तकुमार पाटील यांच्या कार्यपद्धतीचा, कार्यकर्त्यांशी असलेल्या संपर्काचा आणि स्थानिक पातळीवरील सामाजिक व संघटनात्मक सहभागाचा उल्लेख करत अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाला पसंती दर्शवली. कारदगा जिल्हा पंचायत मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अनेक नावे चर्चेत असली, तरी दत्तकुमार पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या कार्यकर्त्यांच्या बैठका आणि राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी निश्चित करताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि मागणीचा विचार करावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
दरम्यान,याबाबत बेडकीहाळ ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील यांच्याशी विचारणा केली असता, कार्यकर्त्यांची इच्छा आणि मागणी असेल तर आपण काँग्रेस पक्षाकडून कारदगा जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत,असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र,उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आपण मान्य करू, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कारदगा जिल्हा पंचायत मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारी चर्चेला आणखी वेग आला आहे.
आज 13 नोव्हेंबर बेडकीहाळ येथे दत्तकुमार पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या अनौपचारिक चर्चेत कारदगा जिल्हा पंचायत निवडणुकीचा विषय केंद्रस्थानी राहिला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दत्तकुमार पाटील यांनीच काँग्रेसकडून निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी केली. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी निश्चित करताना या मागणीची दखल घेतली जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कारदगा जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रात कारदगा, मांगुर आणि मानकापूर या 3 तालुका पंचायत मतदारसंघांचा समावेश असून, कारदगा, मांगुर, बारवाड, ढोणेवाडी, बोरगाववाडी, मानकापूर आणि कसनाळ अशा 7 गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात जवळपास 30 हजार मतदार आहेत.
एकंदरीत, कारदगा जिल्हा पंचायत मतदारसंघांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील उमेदवारीच्या हालचालींना वेग येत असून, कारदगा मतदारसंघातून दत्तकुमार पाटील यांच्या नावासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेला पुढाकार आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

“कारदगा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दत्तकुमार पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा..! “कार्यकर्त्यांचा एकमुखी सूर; ‘दत्तकुमार पाटील यांनीच निवडणूक लढवावी’ अशी मागणी, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे दत्तकुमार पाटील यांचे स्पष्ट मत”..!

traffic tail

“कारदगा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दत्तकुमार पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा..! “कार्यकर्त्यांचा एकमुखी सूर; ‘दत्तकुमार पाटील यांनीच निवडणूक लढवावी’ अशी मागणी, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे दत्तकुमार पाटील यांचे स्पष्ट मत”..!

error: Content is protected !!