Edition

फायनान्स वाल्यांची बळजबरीची वसुली तात्काळ थांबवा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

शिंदे सेनेचे नेते यांनी तहसीलदार सेलु यांची भेट घेतली.

सेलू : सेलू शहर व तालुक्यात अनेक गावातील लोकांनी मायक्रो फायनान्स व इतर फायनान्सची पैसे घेतलेले आहेत पण दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे अनेक लोकांना या फायनान्सची हप्ते भरणे जड जात आहे. महाराष्ट्र शासनाने सांगितलेले आहे की बळजबरी वसुली कोणत्याही फायनान्सने करू नये. पण या आदेशाची पायमल्ली करत अनेक ठिकाणी बळजबरीने वसुली चालू आहे. अशा अनेक तक्रारी आल्यानंतर आज तहसीलदार सेलू यांची भेट घेतली व ही बळजबरीची फायनान्स ची वसुली थांबविण्यासाठी चर्चा केली व या फायनान्स वाल्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना करा. असे सांगितले नसता शिवसेना स्टाईल त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल अशी सूचना केली. यावेळी जयसिंग शेळके किशोर भांडवले, पिंटू पवार, शिवाजी मोकाटे, रवी लांडगे व इतर उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!