अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस 72 62 ट्रेड युनियनच्या वतीने राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश बेनिवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संघटनेमधील देशातील राज्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सभासद उपस्थित होते. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस ट्रेड युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश बेनिवाल यांच्या हस्ते डॉ. अनुपम बेगी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
डॉ.अनुपम बेगी हे गेली 30 वर्षापासून कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. देशातील महानगर महापालिका, नगरपरिषद, कॅन्टोन्मेंट बोर्ड, अनेक शासकीय कार्यालय मधील सफाई कर्मचाऱ्यांसाठी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. मोर्चा. उपोषणाद्वारे त्यांना न्याय देण्याचे काम करत आहे.
त्यांच्या या निवडीने देशभरातून त्यांना अभिनंदनचा वर्षाव होत आहे









