
डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात सर्वाधिक भाव.
सेलू : दि.10 नोव्हें. 26 रोजी दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कापूस लिलावात शुभारंभ करण्यात आला. यावेळी सभापती डॉ संजय रोडगे यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात सर्वाधिक भाव दिल्याचे नोंद झाली. बाजार समिती या कार्य क्षेत्रातील मानाचे शेतकरी हरिभाऊ रामदास हातकडके रा. देऊळगाव गात यांच्या कापसाला प्रतिक्विंटल 9501/- रुपये दर मिळाला तर दुसरे शेतकरी अनिल भगवानराव शेंडगे रा. डासाळा यांच्या कापसाला प्रतिक्विंटल 9451/- रुपये दर मिळाला तर सेलू बाजार समितीचे सभापती यांच्या आग्रहाच्या विनंतीनुसार उर्वरित शेतकऱ्यांच्या कापसाला 9401/- रुपये दर देण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे माजी सभापती दिनकर वाघ, संचालक अँड.दतराव कदम, अनिल पवार, प्रसाद डासाळकर, भास्करराव पडघन, केशव सोळंके, ज्ञानेश्वर ताठे, ज्ञानेश्वर राऊत, शैलेश तोष्णीवाल,रामेश्वर राठी, अनिल बर्डे, रितेश तोष्णीवाल, शरद आकात आदी उपस्थित होते. तसेच कापूस खरेदीदार भारतीय कापूस निगमचे अधिकारी निर्मल जैन, आशिष बिनायके, अविनाश बिहानी,गोपाळ काबरा, रामेश्वर राठी, विजय पवार, प्रभुदयाल मंत्री, अमोल दायमा, संतोष काष्टे, आदी व्यापारी उपस्थित राहून कापूस खरेदी प्रक्रियेत सहभाग नोंदवला. बाजार समितीचे प्रभारी सचिव आनंद बेले, राजू वाघ इतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजय रोडगे यांनी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान केले आहे की, शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री आणताना चांगल्या दर्जाचा कापूस व कमी दर्जाचा कापूस वेगवेगळा ठेवावा. त्यामुळे कापसाची प्रतवारी योग्य प्रकारे होऊन शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य व समाधानकारक दर मिळण्यास मदत होईल.









