कोल्हापूर दि.१६ प्रविण केर्ले : आरोग्य सेवा अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महापल्स’ या अद्ययावत प्रकल्पाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून ‘पायलट प्रोजेक्ट’ (प्रायोगिक तत्त्वावर) म्हणून करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अमुलाग्र आणि गुणवत्तापूर्ण बदल घडून येईल. येत्या काळात संपूर्ण राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात हा प्रकल्प क्रांतिकारक आणि दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
महा-पल्स एआय या महत्वकांक्षी प्रकल्पाची सुरुवात कोल्हापुरात सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅसमिन, आरोग्य सभापती सारिका नरंदेकर, शिक्षण सभापती शितल यादव, आयआयटी मंडीचे अधिष्ठाता डॉ. सत्वशील पवार, हर्षवर्धन काळोखे, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रकाश आबिटकर म्हणाले, उत्तर प्रदेश सरकारच्या ‘HOPE’ (Health Online Parameter Evaluation Center) मॉडेलपासून प्रेरणा घेऊन हा प्रकल्प राबवला जात आहे. विशेष म्हणजे, आयआयटी मंडी (IIT Mandi) चे अधिष्ठाता प्रा. पवार सर आणि हर्षवर्धन काळोखे यांच्या सहकार्याने यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, हे मॉडेल उत्तर प्रदेशपेक्षाही अधिक प्रगत आहे. आरोग्य विभागाच्या सादरीकरणा दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महापल्स’ प्रकल्पाचे विशेष कौतुक करत ‘एक्सलंट’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली असल्याचे सांगून मुख्यमंत्री यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकही या प्रणालीला एक्सलंट अशीच प्रतिक्रिया देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
*रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि एआय (AI) अलर्ट सिस्टीम*











