Edition

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना करवीर शिवसेनेतर्फे विनम्र अभिवादन १४ व्या स्मृतिदिनानिमित्त घोषणाबाजीने दणाणला परिसर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर (प्रतिनिधी) :
उदय साळुंखे

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक ३ मधील बाल हनुमान मित्र मंडळाच्या हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी “अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब अमर रहे” आणि “परत या, परत या, बाळासाहेब परत या” अशा गगनभेदी घोषणांनी शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी भावना व्यक्त करताना तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, “आम्हा शिवसैनिकांचे दैवत, युगपुरुष, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, मराठी मनाचे मानबिंदू आणि हिंदुस्थानचे महानेते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो.”
या अभिवादन सभेस करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्यासह बाळासाहेब नलवडे, दीपक पाटील, संतोष चौगुले, विक्रम चौगुले, अरविंद शिंदे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, शरद माळी, सागर पाटील, दत्ता फराकटे, प्रकाश मुदुगडे, अक्षय परीट, रामराव पाटील, नितीन निकम, धनंजय पाटील, अजित चव्हाण आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

शिराळा. मेणीखोऱ्यातील मोबाईल नेटवर्कसाठी मेणी फाट्यावर तीन तास रास्ता रोको. मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आक्रमक; २४ तास नेटवर्क मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा..

नणदी व बेडकिहाळ येथील शेतकऱ्यांचे एकरी १०० टन उसाचे विक्रमी उत्पादन! चिदानंद बसप्रभू कोरे साखर कारखाना व यु.पी.एल. कंपनीच्या संयुक्त ऊस विकास योजनेला यश; आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना लाभ.

अजितदादांच्या पुतळा अनावरणाच्या दिवशी रोहित पवारांचे वक्तव्य म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार! आमदार सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका; ‘देवाभाऊ कलियुगातील अभिमन्यू, चक्रव्यूहात अडकणार नाहीत’

महा-पल्स एआय’ (MahaPulse) प्रकल्पाचा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ जबाबदारी आणि गुणवत्ता यांचा मिलाप असणारा महा-पल्स एआय प्रकल्प राज्यातील आरोग्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू; हप्ते बंद झालेल्या महिलांना दिलासा? १६ नोव्हेंबरपासून e-KYC प्रक्रियेला सुरुवात; पहिल्याच दिवशी OTP आणि सर्व्हरच्या अडचणींमुळे महिलांची धावपळ

traffic tail

शिराळा. मेणीखोऱ्यातील मोबाईल नेटवर्कसाठी मेणी फाट्यावर तीन तास रास्ता रोको. मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आक्रमक; २४ तास नेटवर्क मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा..

नणदी व बेडकिहाळ येथील शेतकऱ्यांचे एकरी १०० टन उसाचे विक्रमी उत्पादन! चिदानंद बसप्रभू कोरे साखर कारखाना व यु.पी.एल. कंपनीच्या संयुक्त ऊस विकास योजनेला यश; आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना लाभ.

अजितदादांच्या पुतळा अनावरणाच्या दिवशी रोहित पवारांचे वक्तव्य म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार! आमदार सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका; ‘देवाभाऊ कलियुगातील अभिमन्यू, चक्रव्यूहात अडकणार नाहीत’

error: Content is protected !!