
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई) महाराष्ट्र राज्य, अध्यक्षपदी खडकवासला पाटबंधारे विभागाचे माजी कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांची निवड करण्यात आली.
पांडुरंग शेलार हे गेली अनेक वर्ष सामाजिक व विधायक क्षेत्रामध्ये कार्यरत असून महाराष्ट्रातील हजारो अभियंत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत सक्रिय असतात.
संघटनेच्या दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी शिवाजीनगर, पुणे येथील इन्स्टिटयुशन ऑफ इंजिनिअर्स सभागृहात घेतलेल्या सर्वसाधारण सभेत व निवडणूकीमध्ये १५ जणांची महाराष्ट्र राज्य कारिणीची निवड निवडणूक निर्णय अधिकारी पी.के. त्रिभूवन यांनी केली.
नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी या प्रमाणे
अध्यक्ष :पांडुरंग शेलार (पुणे)
उपाध्यक्ष :एम. जे. वाघमारे (मुंबई)
उपाध्यक्ष :भास्कर एच. खोब्रागडे (मुंबई)
जनरल सेक्रेटरी :संजीवन गायकवाड (नांदेड)
संघटन सचिव :शैलेश टेंभूर्णीकर (नागपूर)
सहसचिव :विजय कांबळे (पिंपरी चिंचवड)
कोषाध्यक्ष :शामराव सावळे (हिंगोली)
इंटरनल ऑडीटर :भरत कानिंदे (परभणी)
कार्यकारिणी सदस्य :रेवतकुमार बोरकर (नागपूर)
अनिल खडसे (वर्धा)
सौ. मीना मेश्राम (नागपूर)
किशोर सवाने (चंद्रपूर)
विजय मंगळे (धुळे)
दादाराव वाकोडे (संभाजीनगर)
नवनाथ शिंदे (लातूर)
(पांडुरंग शेलार) अध्यक्ष
बानाई महाराष्ट्र राज्य










