Edition

कागदोपत्री आठ घंटागाड्या प्रत्यक्षात चार रस्त्यावर,कामगार 26 पण बिल मात्र 55 कामगाराच, कामाशिवाय पूर्ण बिल अदा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हुपरी प्रतिनिधी – हुपरी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना प्रत्यक्ष स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नगरसेवकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? दोन बिले अदा, तिसऱ्या बिलाची मागणी; कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाची पडताळणी झाली का? आरोग्य सभापती वर ठेकेदाराची दादागिरी
घनकचरा व्यवस्थापनाच्या चौकशीची मागणी हिंदू महासभेचे १५ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण
इस्टिमेटमध्ये आठ घंटागाड्यांची तरतूद असताना प्रत्यक्षात चार-पाचच गाड्या कार्यरत असल्याचा आरोप असून, घंटागाड्या वेळेवर येत नसल्याच्या आणि काम अपूर्ण असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी लेखी तसेच तोंडी स्वरूपात संबंधित अधिकाऱ्यांकडे केल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही बिलांची मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने प्रत्यक्ष काम किती आणि बिलांची वसुली किती, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी अखिल भारत हिंदू महासभेने केली आहे. या कामाची बेकायदेशीर दोन बिले ठेकेदाराला अदा करण्यात आली असून, तिसऱ्या बिलाची काम अपुर्ण असताना तिसय्रा बिलाची मागणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे करारपत्रात नमूद केल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले आहे का, याची पडताळणी कोणत्या अधिकाऱ्यांनी केली आणि त्यानंतरच बिले अदा करण्यात आले का, याचा खुलासा करण्याची मागणी होत आहे.कामावर प्रत्यक्षात 26 कामगार असताना 55 कामगारांचे बिल अदा करण्यात एस आय सचिन भोसले यांनी प्रत्यक्ष कामगार कुठे असे विचारले असता भोसले यांना उत्तर देता न आल्याने त्यांची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
कर्मचाऱ्यांचे किमान वेतन, उपस्थिती नोंदवही,बँक खात्यातील वेतन जमा झाल्याचे पुरावे आणि संबंधित तपासणी अहवालांची पडताळणी करण्याची गरज आहे.
यापूर्वी ₹१४.८७ लाखांचे बिल मंजूर झाल्यानंतर पुन्हा ₹१६ लाखांच्या बिलाची मागणी झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. नगरसेवकांच्या तक्रारी, ग्राउंड रिपोर्ट आणि नागरिकांच्या अनुभवांत तफावत असल्याचा दावा होत असताना बिलांना मंजुरी देण्यापूर्वी प्रत्यक्ष कामाची तपासणी झाली होती का, मोजमाप पुस्तिकेतील (M.B.) नोंदींची पडताळणी कोणी केली आणि सुट्टीच्या दिवशी ऑनलाइन पेमेंट का करण्याची गडबड याची वस्तुस्थिती काय, त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दोन बिले अदा आणि तिसऱ्या बिलाची मागणी असताना कामाची गुणवत्ता, घंटागाड्यांची संख्या आणि कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाची खात्री कोणी केली? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.प्रत्यक्ष काम आणि बिलांचा ताळमेळ स्पष्ट करावा, या मागणीसाठी अखिल भारत हिंदू महासभा, शहर हुपरीच्या वतीने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हुपरी नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

एसआयआर अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 99.94 काम पूर्ण बिनचूक मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – एसआयआर कामकाज, पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा

traffic tail

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

error: Content is protected !!