यड्राव ( प्रतिनिधी ) : येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील बुद्ध विहार येथे बोधीसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास माजी सरपंच उल्हास भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच सामुहिक भारताचे संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सरदार सुतार, माजी ग्रा प . सद्स्य रंगराव कांबळे, सद्स्या मंगल कांबळे, अक्षय भोसले (मेजर ), गुरुनाथ ढोबळे, आरपीआय शाखा अध्यक्ष प्रमोद कांबळे, दादासो पाटणकर, सुरेंद्र पोवार, सुमेर सुतार, निखिल कांबळे, रोहित कांबळे, व समाज बांधव उपस्थित होते. तसेच यड्राव ग्रामपंचायत येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माजी सरपंच कुणालसिंह नाईक – निबांळकर व माजी ग्रा.प. सद्स्य रंगराव कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच यावेळी सामुहिक भारताचे संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. यावेळी प्रमोद कांबळे, पत्रकार उत्तम जगताप, ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर व सर्व ग्रा.प. कर्मचारी उपस्थित होते.









