Edition

संविधान वाचणं म्हणजेच हक्क वाचणं – भिमराव गोंधळी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी
उदय साळुंखे

दि. २६*

गडमुडशिंगी, ता. करवीर येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस शिवाजी कांबळे, राजू जाधव, मनोहर कांबळे, अशोक भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष भिमराव गोंधळी म्हणाले, “२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले गेले आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते लागू झाले. बाबासाहेबांनी २ वर्षे, ११ महिने, १८ दिवस अथक मेहनत घेऊन जगातील सर्वात मोठे लिखित संविधान देशाला दिले. संविधानामुळेच प्रत्येकाला समान संधी मिळते. संविधानामुळेच गरीबातील गरीब माणूस पंतप्रधान होऊ शकतो. शिक्षणाचा हक्क, समानतेचा हक्क, मतदानाचा हक्क, बोलण्याचा हक्क, न्याय मिळवण्याचा हक्क आणि धर्म स्वातंत्र्य हे सर्व संविधानामुळेच आपल्याला मिळाले आहे, हे विसरता कामा नये. संविधान वाचणे म्हणजेच आपले हक्क वाचणे आहे.”

कार्यक्रमाचे आभार करवीर महासचिव अर्जुन कांबळे यांनी मानून सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी दीपक डोणे, दीपक पुरेकर, संदीप आईद, अर्जुन गोंधळी, करवीर महासचिव, संतोष कांबळे, सचिव, संदीप गोंधळी, कोषाध्यक्ष, कुमार सोनुले, सारंग कांबळे, सचिन गोंधळी, विकी कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा उभारणे बंधनकारक; नदी-नाल्यांत किमान एक मीटर पाणी अडविण्याचे निर्देश पाणी संवर्धन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि ग्रामीण रोजगाराला प्राधान्य; दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

traffic tail

प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा उभारणे बंधनकारक; नदी-नाल्यांत किमान एक मीटर पाणी अडविण्याचे निर्देश पाणी संवर्धन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि ग्रामीण रोजगाराला प्राधान्य; दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

error: Content is protected !!