शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी येथे संविधान दिन उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरवात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने व संविधान पुजनाने झाली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन संपन्न झाले.
यानंतर सामुदायिक संविधान वाचन करण्यात आले. विद्यालयाचे शिक्षक श्री. समाजे सी.बी.यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले .या सोबत विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनीनी देखील सामुदायिकपणे भारतीय संविधान वाचन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन भारतीय संविधाना विषयी व संविधानाचे महत्व तसेच संविधानाची निर्मिती करताना लागलेला कालावधी या विषयी माहिती सांगितली.
तसेच श्री.हेमगिरे एस.के. सर यांनी आपल्या मनोगतातुन भारतीय संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.
या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.शिकलगार एफ.आय.यांनी केले तर आभार सौ.चौगुले ए.ए.यांनी मानले.









