Edition

सेलू नगरपालिकेस मिळाली अत्याधुनिक जेटिंग कम सक्शन मशीन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

स्वच्छता व्यवस्थेला मिळाणार अधिक गती.

सेलू: येथील नगर परिषदेस स्वच्छ महाराष्ट्र अभियान ( नागरी ) २.० अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून अत्याधुनिक जेटिंग कम सक्शन मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मशिनमुळे नाले,गटारे, शौचालय आणि सांडपाणी वाहिन्यांच्या स्वच्छतेच्या कामांना गती मिळाणार असून, स्वच्छता व्यवस्थेला आधुनिक यंत्रणेचे बळ मिळणार आहे. या सोबतच सेलू नगरपरिषदेस फायर ब्रिगेड बुलेट ही गाडी मिळाली आहे. सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या हस्ते गुरुवार ( दि.२६) रोजी जेटिंग कम सक्शन मशीनचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक वाघमारे, पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, नगरसेवक मनीष कदम, प्रशांत ठाकूर,उद्योजक अविनाश बिहाणी, कार्यालयीन अधीक्षक अंकुश जाधव यांच्यासह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. या अत्याधुनिक मशीनमध्ये जेटिंग आणि सक्शन अशा दोन स्वतंत्र प्रणालींचा समावेश आहे. जेटिंग प्रणालीद्वारे उच्च दाबाने पाणी सोडून गटारांमधील अडथळे दूर करता येणार आहेत, तर सक्शन प्रणालीच्या साह्याने गटारे व सांडपाणी वाहिन्यांमधील साचलेला गाळ, कचरा व पाणी बाहेर काढणे शक्य होणार आहे. त्यामुळे स्वच्छतेची कामे अधिक जलद आणि परिणामकारक पद्धतीने पूर्ण करता येतील. विशेषतः पावसाळ्यात गटारे तुंबणे, सांडपाणी वाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होणे तसेच पाणी साचण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यास या मशीनची मदत होणार आहे. सेप्टिक टैंक आणि गटारांची स्वच्छता अधिक शास्त्रोक्त व सुरक्षित पद्धतीने करता येणार असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे श्रमही कमी होणार आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा उभारणे बंधनकारक; नदी-नाल्यांत किमान एक मीटर पाणी अडविण्याचे निर्देश पाणी संवर्धन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि ग्रामीण रोजगाराला प्राधान्य; दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

traffic tail

प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा उभारणे बंधनकारक; नदी-नाल्यांत किमान एक मीटर पाणी अडविण्याचे निर्देश पाणी संवर्धन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि ग्रामीण रोजगाराला प्राधान्य; दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

error: Content is protected !!