Edition

मलिकवाड ग्रामपंचायत कार्यालयात श्री.संत कनकदास जयंती उत्साहात साजरी!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.

मलिकवाड (ता.चिकोडी) येथील ग्रामपंचायत कार्यालयात संतश्रेष्ठ श्री.कनकदास जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संत कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

संत कनकदास हे महान संत, कवी, समाजसुधारक आणि भक्ती चळवळीतील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या साहित्याच्या व विचारांच्या माध्यमातून समाजाला समता, बंधुता, मानवता आणि भक्तीचा संदेश दिला. समाजातील भेदभाव दूर करून सर्वांनी समानतेने जीवन जगावे, असा मोलाचा विचार त्यांनी आपल्या कार्यातून मांडला. त्यांच्या विचारांचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत विकास अधिकारी (पीडीओ) श्री. प्रकाश दळवाई सर, सेक्रेटरी श्री. पडोळकर सर, कॉम्प्युटर ऑपरेटर श्री. राजू कटीकर, डॉ. संतोष कटीकर, माजी सैनिक श्री. महादेव कटीकर, श्री. बाळू गुडे ग्रामपंचायत कर्मचारी तसेच अंगणवाडी शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.

संत कनकदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याचे आणि सामाजिक विचारांचे स्मरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी संतांच्या विचारांचा आदर्श आपल्या जीवनात जोपासण्याचे आवाहन केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा उभारणे बंधनकारक; नदी-नाल्यांत किमान एक मीटर पाणी अडविण्याचे निर्देश पाणी संवर्धन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि ग्रामीण रोजगाराला प्राधान्य; दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

traffic tail

प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा उभारणे बंधनकारक; नदी-नाल्यांत किमान एक मीटर पाणी अडविण्याचे निर्देश पाणी संवर्धन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि ग्रामीण रोजगाराला प्राधान्य; दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

error: Content is protected !!