गांधीनगर:प्रतिनिधी-उदय साळुंखे
गांधीनगर: पोलंडच्या महाविद्यालयीन
युवक-युवती आणि प्रतिनिधी अशा २३ जणांनी वळिवडे ता.करवीर येथील वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. यावेळी भारत सरकारच्या क्रीडा आणि युवक मंत्रालयातील अधिकारी, शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एलएसएस) अधिकारी आणि राजाराम महाविद्यालयातील काही विद्यार्थी त्यांच्यासोबत होते.
पोलंडच्या विविध भागांतील महाविद्यालयीन युवकांनी जामसाहेब मेमोरियल युथ एक्सचेंज उपक्रमांतर्गत ही भेट दिली.
या युवकांचे स्वागत कोल्हापुरी फेटे बांधून हलगी, घुमके, कैताळ आणि तुतारीच्या निनादात करण्यात आले. त्यानंतर प्रा. डॉ. प्रवीण जाधव यांनी पोलंडवासियांच्या आठवणींना उजाळा देत वळिवडे आणि पोलंडवासियांचे ऋणानुबंध तसेच संभाजीराजे यांच्या विशेष प्रयत्नातून उभे राहत असलेल्या संग्रहालयाची माहिती दिली.
यावेळी भारत सरकारच्या युवक
मंत्रालयाचे सल्लागार दानिश युसूफ, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, राष्ट्रीय डॉ. कबीर खराडे, प्रा. सुजित मुंढे, गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलाश कोडग, विस्तार अधिकारी बी. डी. पाटील, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, ग्रामविकास अधिकारी विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य निवास तामगावे, सनी चंदवाणी, पूनम परमानंदाणी, दीपक जमनानी, आण्णा देवकुळे, प्रताप चंदवाणी, विक्रम मोहिते, आदींसह वळिवडे, गांधीनगर परिसरातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.










