Edition

कोल्हापूर जिल्ह्यातील गुणवंत कामगारांचे कार्य समाजाभिमुख – संघसेन जगतकर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर : (प्रतिनिधी)
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय, गुणवत्तापूर्ण व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संघटीत व सक्रिय गुणवंत कामगारांची जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध कमिटी / समितीवर निवड करणेत आललेबद्दल, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्यावतीने, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक संघसेन जगतकर यांच्या हस्ते पुस्तकरूपी ग्रंथ, गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील गुणवंत कामगारांचे कार्य समाजाभिमुख असल्याचे प्रतिपादन संघसेन जगतकर यांनी केले.
जिल्ह्यातील गुणवंत कामगारांच्या अनुभवाचा व कार्यकौशल्याचा उपयोग शासकीय यंत्रणेला व्हावा तसेच कामगार वर्गाचा योग्य सहभाग शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये व निर्णय प्रक्रियेत राहावा, या उद्देशाने राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वेळोवेळी लेखी निवेदने सादर करण्यात आली होती.
सदर मागणीचा सकारात्मक विचार करून सन २०२२, सन २०२५ व सन २०२६ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना, त्यांच्या अखत्यारितील समित्या/कमिट्या/सल्लागार मंडळे अथवा संबंधित उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील गुणवंत कामगारांना योग्य प्रतिनिधित्व देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
सदर पत्रव्यवहारास अनुसरून जिल्ह्यातील अनेक शासकिय कार्यालयांच्या कमिटी / समितीवर नियुक्ती झालेबद्दल राजारामपुरी कोल्हापूर येथील कार्यालयात संबंधित गुणवंतांचा असोसिएशनच्या वतीने सत्कार करणेत आला.
यावेळी प्रमुख पाहुणे संघसेन जगतकर यांनी असोसिशनच्या स्थापनेपासून आजपर्यंत सुरू असलेल्या समाजाभिमुख कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. गुणवंत कामगारांनी आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेले असून, त्यांच्या अनुभवाचा उपयोग शासकीय योजना, कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा, कौशल्यविकास, रोजगार, सामाजिक उपक्रम व इतर जनहिताच्या कामांमध्ये होऊ शकतो. यासाठी उपस्थित सर्वच गुणवंत कामगारांना शुभेच्छा दिल्या.
असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी, भारतीय राज्यघटनेने लोकशाही, सामाजिक न्याय, समानता, पारदर्शकता, उत्तरदायित्व, निष्पक्ष प्रशासन आणि कायद्याचे राज्य ही मूल्ये शासन व्यवस्थेची मूलभूत तत्वे म्हणून स्वीकारली आहेत. शासनाच्या अखत्यारीतील विविध महामंडळे, मंडळे, प्राधिकरणे, आयोग, सल्लागार समित्या, संचालक मंडळे, स्वायत्त संस्था व इतर सार्वजनिक संस्थावरील नियुक्ती या सार्वजनिक स्वरूपाच्या असल्याने त्या मनमानी, पक्षपाती किंवा अपारदर्शक पद्धतीने न होता वस्तुनिष्ठ, विवेकपूर्ण, न्याय आणि घटनात्मक निकषांवर आधारित असणे आवश्यक आहे. यास अनुसरूनच जिल्हा प्रशासनाने आपल्या मागणीची दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले तसेच उर्वरीत गुणवंत कामगारांची लवकरात लवकर नियुक्ती व्हावी, यासाठी प्रयत्नशील असलेचे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सत्कारास उत्तर देताना सर्वच गुणवंत कामगारांनी यापुढेही भरीव कार्य करण्याचा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे संघसेन जगतकर यांचे पुस्तकरूपी ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत महादेव चक्के यांनी केले. प्रास्ताविक अनिता काळे यांनी केले तर रावण समुद्रे यांनी आभार मानले.
यावेळी अनिता काळे, संजय सासने, महादेव चक्के, भगवान माने, प्रविण भिके, संभाजी थोरात, सुभाष पाटील, रघुनाथ मुधाळे, संजय गुरव, संतराम जाधव, दिनकर आडसुळ, रावण समुद्रे, प्रशांत उपाध्ये, संजय चव्हाण, मुनीर मुल्ला आदी. गुणवंत कामगार उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

एसआयआर अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 99.94 काम पूर्ण बिनचूक मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – एसआयआर कामकाज, पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा

traffic tail

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

error: Content is protected !!