Edition

नेपाळ महापुरात ८ आंध्रप्रदेशचे यात्रेकरू बेपत्ता, टिबेट-नेपाळ सीमेवर भारतीय अडकले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नेपाळ – टिबेट सीमेवर झालेल्या ढगफुटी आणि महापुरामुळे २८८ भारतीय संपर्काबाहेर गेले असून बेपत्ता आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

यामध्ये *रिचा ट्रेक्स ग्रुप (Richa Tours Operator)* सोबत मानस सरोवर यात्रेला गेलेल्या

 *वेंकटराम अन्नमदेवरा (वय ५२)*

*अनघा अन्नमदेवरा (वय ४९)*

या दाम्पत्याचाही समावेश आहे. त्यांचे शेवटचे लोकेशन *टिबेट सीमेजवळील नेपाळच्या रसुवागढी / तिमुरे* परिसरात होते.

दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना चीनची सीमा ओलांडायची होती, त्याचवेळी आलेल्या पुरामुळे रसुवागढी पूल वाहून गेला आहे. त्या भागातील मोबाईल आणि इंटरनेट संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

या ग्रुपमधील ८ आंध्रप्रदेशचे यात्रेकरू बेपत्ता असून याबाबत भारतीय दूतावासाला माहिती देण्यात आली आहे. सध्या २१ तामिळनाडूच्या यात्रेकरूंना वाचवण्यात यश आले आहे.

*कोणाला काही माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क साधा :*

*टूर ऑपरेटर – रिचा टूर्स : +९७७ ९८१७९०६२२५*
*भारतीय दूतावास हेल्पलाईन, नेपाळ*

कृपया हा फोटो / पोस्टर जास्तीत जास्त शेअर करा. टिबेट आणि नेपाळ सीमेजवळ कोणाचा संपर्क असेल तर त्यांना कळवा.

*प्रतिनिधी: अनिलकुमार डेक्कण्णवर, सदलगा*

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!