Edition

दारुवाला पेट्रोल पंपावर ‘ऑनलाइन’ २४ तास, डिझेल, पेट्रोल,सीएनजी सेवा सुरू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे,३ सप्टेंबर २०२६ : शिवाजीनगर येथील महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचा (एमएनजीएल) डेपो ते लष्कर परिसरातील दारुवाला पेट्रोल पंपापर्यंत थेट सीएनजी गॅस आणण्यात यश आले आहे. बुधवार दि.२ सप्टेंबर २०२६ मध्यरात्रीपासून सीएनजी गॅस वितरण चालू झाले असून वाहनचालकांना १६ सप्टेंबर पर्यंत रात्री ११ ते सकाळी ७ या कालावधीत सुरुवातीला सीएनजी गॅस इंधन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. सदर १६ सप्टेंबर नंतर २४ तास ही सेवा उपलब्ध होणार आहे.

करोडो रुपये खर्च करून ९ इंची पाइपलाइन १ वर्षांपासून भूअंतर्गत घालण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यांना तोंड देत हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आणि एमएनजीएलच्या संयुक्त प्रयत्नांनी सीएनजी पाइपलाइन  सोलापूर रस्त्यावरील पूलगेट येथील दारुवाला पेट्रोल पंपापर्यंत नेण्यात आली.

लष्कराच्या सदर्न कमांडचे वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडीयर तरुनेश यांच्या प्रयत्नांमुळे १३ वर्षांपासून रखडलेली परवानगी संरक्षण मंत्रालयाने अखेर दिली.

चाचणी अंती आता पूर्ण दाबाने सीएनजी पुरवठा दारुवाला पंपावर सुरू झाला. पुणे लष्कर परिसरातील हा पहिलाच पेट्रोल पंप ठरला असून पंपावर सीएनजी भरणा सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना कोणतीही गैरसोय होणार नाही असे पेट्रोल पंप चालक आणि ऑल इंडिया पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अली दारुवाला यांनी सांगितले. १९६५ पासून हा पंप नागरिकांच्या सेवेत आहे. अशी माहिती दारूवाला पेट्रोल पंपाचे संचालक अली दारूवाला यांनी दिली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!