Edition

कोल्हापूर : गोकुळ अध्यक्ष निवडणुकीत नवा ट्विस्ट; सुट्टीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी : प्रविण केर्ले
कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचा केंद्रबिंदू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दररोज नवी वळणे येत आहेत. सत्ताधारी व विरोधक यांच्यातील सत्तासंघर्ष आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचपर्यंत पोहोचला आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच, प्रशासकीय पातळीवरून आणखी एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे.

निवडणूक प्रक्रियेची धुरा सांभाळणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांची राज्य शासनाने तडकाफडकी बदली केली आहे. विशेष म्हणजे हा बदलीचा आदेश सुट्टीच्या दिवशी काढल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार मौसमी बर्डे चौगुले यांना अपर जिल्हाधिकारी (गट-अ) संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र, बदलीच्या आदेशात महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा होईपर्यंत मौसमी चौगुले यांनी नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होऊ नये, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत त्या याच प्रक्रियेचा भाग राहतील.

अशा तणावपूर्ण वातावरणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची अचानक बदली होणे हा चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. ही नियमित पदोन्नती प्रक्रिया असल्याचे सांगितले जात असले, तरी राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अशा निर्णयांचे ‘टायमिंग’ संशयाचा मुद्दा ठरत आहे. या घडामोडीचा गोकुळच्या आगामी राजकारणावर नेमका काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!