Edition

चंद्रकांतदादा पाटील यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा निषेध; संतोष पंडित यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन..दादांची माफी मागा अन्यथा पंडित याला बदडून काढू महेश खराडे यांचा इशारा …

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चंद्रकांतदादा पाटील यांच्याबद्दल संतोष पंडित यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह व चुकीच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज शुक्रवारी पाचवा मैल (तासगाव) येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून संतोष पंडित यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पंडित याने चंद्रकांत दादा पाटील यांची माफी मागावी अन्यथा त्याला बद्डून काढू असा इशारा भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला .
यावेळी बोलताना भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश खराडे यांनी संतोष पंडित यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले, “चंद्रकांतदादा पाटील यांच्याबद्दल चुकीचे आणि अवमानकारक वक्तव्य करणे खपवून घेतले जाणार नाही. संतोष पंडित यांनी तातडीने चंद्रकांतदादांची जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
पंडित यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करताना खराडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. “राजकीय मतभेद असू शकतात; मात्र ज्येष्ठ नेत्यांबद्दल बोलताना भाषेचे भान ठेवले पाहिजे. वयावरून टीका करण्यापेक्षा त्यांच्या कार्यावर आणि विचारांवर बोलावे,” असेही खराडे यांनी सांगितले.
दरम्यान, परिसरात जमावबंदीचा आदेश लागू असल्याने आंदोलनात मोजक्याच कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी संतोष पंडित यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला.
या आंदोलनावेळी प्रशांत महाडिक, रामचंद्र मोरे, चैतन्य सपकाळ यांच्यासह मोजके भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले.
“चंद्रकांतदादांची माफी मागितल्याशिवाय हा विषय थांबणार नाही,” असा इशारा यावेळी भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!