Edition

कोल्हापूर रेल्वे डेपोतील OBHS कामगारांवर अन्याय? अनुभवी १०–१२ वर्षांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून दूर केल्याचा आरोप; किमान वेतनासह पुनर्नियुक्तीची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर | प्रतिनिधी — उदय साळुंखे
कोल्हापूर रेल्वे डेपो येथे नव्या OBHS (On Board Housekeeping Services) कंत्राटानंतर जुन्या व अनुभवी कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याचा गंभीर आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे. मागील १० ते १२ वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या OBHS, ACCA तसेच EHK (On Board Supervisor) पदावरील कर्मचाऱ्यांना नव्या कंत्राटदाराकडून कामापासून दूर ठेवण्यात आल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
VDK Facility Services या नव्या कंत्राटदाराकडून अनुभवी कर्मचाऱ्यांच्या जागी नव्या कामगारांची नियुक्ती करण्यात येत असून, त्यांना तुलनेने कमी वेतनात काम करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षे सेवा केलेल्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावल्याचे कामगारांनी सांगितले.
या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी रेल्वे कामगार युनियनचे कोल्हापूर शहर अध्यक्ष इम्रान शिकलगर यांनी कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. रेल्वे प्रशासन, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अनुभवी कामगारांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच सर्व कामगारांना शासन नियमानुसार किमान वेतन, कामगारांचे हक्क आणि रोजगाराचे संरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, हा प्रश्न केवळ कोल्हापूर रेल्वे डेपोपुरता मर्यादित न ठेवता कंत्राटी कामगारांच्या रोजगार व वेतनाच्या प्रश्नाकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून याबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!