Edition

खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे क्रीडा महोत्सवास प्रारंभ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी येथे क्रीडा महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
कार्यक्रमाची सुरवात पाहुण्यांच्या स्वागताने व प्रास्ताविकेने झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. यासीन मुजावर सर यांनी केले.
प्रास्ताविकेमध्ये पाहुण्यांचे स्वागत व जीवनात खेळाचे महत्व काय आहे हे सांगितले.
यानंतर क्रीडा ज्योतीचे आगमन झाले. क्रीडाज्योत स्विकारुन सरपंच मा.श्री.विशाल कुंभार यांनी क्रीडाज्योतीचे स्वागत केले .
यानंतर दिपप्रज्वलन सरपंच मा.श्री.विशाल कुंभार व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तर प्रतिमापुजन माजी उपसरपंच मा.श्री.गजानन नलगे यांच्या हस्ते करण्यात आले.
या नंतर ध्वज पुजा व ध्वजारोहण करण्यात आले.
खोतवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य मा.श्री वैभव पोवार यांच्या हस्ते क्रीडाध्वज पुजा करण्यात आली.व खोतवाडी गावचे सरपंच मा.श्री.विशाल कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच मैदान पुजन माजी सरपंच मा.श्री.संजय चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.मगदुम एस.बी.यांनी आपल्या मनेगतातुन सर्व विद्यार्थी -विद्यार्थीनीनां क्रिडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व खिलाडुवृत्तीने खेळावे हे मनोगतातुन व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी खोतवाडी गावचे सरपंच मा.श्री.विशाल कुंभार,उपसरपंच मा.श्री.गजानन नलगे,माजी सरपंच मा.श्री.संजय चोपडे,ग्रामपंचायत सदस्य मा.श्री.वैभव पोवार,विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.हेमगिरे एस.के. यांनी केले तर श्री.नाईक ए.आर.यांनी आभार मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

जैन निगम मंडळ स्थापनेसाठी तेरदाळ येथे जैन समाजाचे विराट महामंथन!आचार्य श्री.गुणधरनंदी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हजारो जैन बांधवांची उपस्थिती; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

traffic tail
error: Content is protected !!