Edition

सेलू तालुक्यातील 8 गावात विहिरी व बोअरवेल अधिग्रहित.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

पिण्याच्या पाण्याला जिल्हा प्रशासनाने प्राधान्य.

सेलू : दि.20 ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसह जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार सेलू तालुक्यातील आठ गावांमधील विहिरी व बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. दुष्काळी भागात तत्परतेने पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने पाऊल उचलले असून, संबंधित गावांतील पाणीपुरवठा व्यवस्थेला आधार मिळणार असल्याचे तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी सांगितले आहे. सेलू तालुक्यातील राव्हा, आहेर बोरगाव, तिडी पिंपळगाव, रायपूर, पार्टी कौसडी, कुंडी, तळतुंबा आणि डासाळा या आठ गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने विहीर व बोअरवेल अधिग्रहणाची कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये राव्हा आणि रायपूर येथे विहिरी, तर उर्वरित गावांमध्ये बोअरवेल अधिग्रहित करण्यात आले आहेत.अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरी व बोअरवेलमध्ये राव्हा येथील रामेश्वर कुंडलीकराव देवकते यांची विहीर, आहेर बोरगाव येथील शेख उमर शेख कठाळू यांची बोअरवेल, तिडी पिंपळगाव येथील दत्ता सोपानराव जोगदंड यांची बोअरवेल, रायपूर येथील अमोल बाबासाहेब गाडेकर यांची विहीर, पार्टी कौसडी येथील गणेश नरसिंग आढे यांची बोअरवेल, कुंडी येथील भागवत आन्सिराम मोगल यांची बोअरवेल, तळतुंबा येथील भगवान बाबुराव घुले यांची बोअरवेल आणि डासाळा येथील शेख इद्रीस शेख बडेमिया यांची बोअरवेल अधिग्रहित करण्यात आली आहे. या अधिग्रहणाच्या माध्यमातून संबंधित गावांतील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होणार असून, नागरिकांना तसेच जनावरांना गरजेनुसार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

जैन निगम मंडळ स्थापनेसाठी तेरदाळ येथे जैन समाजाचे विराट महामंथन!आचार्य श्री.गुणधरनंदी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हजारो जैन बांधवांची उपस्थिती; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

traffic tail
error: Content is protected !!