Edition

डपंरसह मुरूम माफियाना तलाठी यांनी रंगेहाथ पकडले,पंचनामा करून कारवाई करण्याचे निर्देश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हुपरी प्रतिनिधी – शासकीय जमिनीवरील अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतुकीचा गोरख धंदा आता भरदिवसाही बिनदिक्कत सुरू असल्याचे उघड झाले आहे. मुरूमाने भरलेला डंपर तलाठी हेमलता शेडश्याळे यांनी रंगेहाथ पकडून पंचनामा करून पोलिसांच्या ताब्यात दिला. मात्र, वाहनासह मुरुम माफियांवर गुन्हा दाखल करण्याबाबत अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने मुरूम माफियांना अभय कोणाचे, असा सवाल उपस्थित होत आहे.

महसूल विभागाच्या निगराणीखाली असलेल्या शेकडो एकर शासकीय भूखंडावर अवैधरित्या ताबा घेऊन वृक्षतोड सुरू असताना नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केल्यामुळे तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली यावेळी तलाठी उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. दूधगंगा डावा कालव्याचा भराव ओसाड माळराने आणि टेकड्यांवर रात्रीच्या अंधारात होणारे उत्खनन खाजगी डेपोमध्ये साठवणूक करून विक्री होते भरदुपारी अधिकारी त्या भागात असतात मुरूमाची वाहतूक होते.असे नागरिकांचे म्हणणे असून हा प्रकार स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असुन दोन महिन्यांपूर्वीही नागरिकांनी अवैध वाहतूक पकडून दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. तरीही हा प्रकार थांबलेला नाही.विशेष म्हणजे, मानेनगरमधील प्लॉटधारकांच्या प्रश्नावर महसूल अधिकारी हुपरीत उपस्थित असतानाच अवैध वाहतूक सुरू होती. ग्रामपंचायत आणि महसूल विभागाच्या परस्पर जबाबदारी झटकण्याच्या भूमिकेमुळे कारवाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असताना केवळ डंपर पकडून चालणार नाही, तर उत्खननाचे मूळ शोधून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे.मुरुम माफियांवर ग्रामपंचायत मधील कोणाचा वरदहस्त आहे का.? खूलेआम मुरुम उत्खनन सुरू असल्यामुळे प्रांत व तहसील ऑफिसची कारवाईचा बडगा काय यावर
लोकांच्यात चर्चा सुरू असुन माफिया वाईट कॉलर टाईट मधे अशी सध्या रेदाळं भागात सुरू आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

जैन निगम मंडळ स्थापनेसाठी तेरदाळ येथे जैन समाजाचे विराट महामंथन!आचार्य श्री.गुणधरनंदी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हजारो जैन बांधवांची उपस्थिती; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

traffic tail
error: Content is protected !!