Edition

खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खोतवाडी – शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल खोतवाडी येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाची सुरवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पुजनाने व दीपप्रज्वलनाने झाली.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.शांतीनाथ मगदुम सर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिप्रज्वलन संपन्न झाले.

यानंतर विद्यालयातील इयत्ता 6 वी तील विद्यार्थी वरद सत्यगिरी याने मनोगतातुन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती सांगितली.

तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. शांतीनाथ मगदुम सर यांनी आपल्या मनोगतातुन शिक्षक दिनाचे महत्व सांगितले.

यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व जीवनात शिक्षकाचे काय महत्व आहे सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी,

शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. शिकलगार एफ.आय. यांनी केले तर आभर श्रीमती जे . के . पाटील (मॅडम)यांनी मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!