

वाशिम प्रतिनिधी : वाशिम-अकोला NH-161 महामार्गावर सावरगावजवळ 29 ऑगस्ट रोजी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात कु. ऋतुजा बालाजी गोटे (वय 19, रा. वाशिम) या युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर ज्ञानेश्वर लादे (वय 20, रा. वसारी, ता. मालेगाव, जि. वाशिम) हा गंभीर जखमी झाला आहे.
गंभीर जखमी ज्ञानेश्वर लादे याला तातडीने उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सावरगावजवळ झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.











