Edition

राज्यकर सहाय्यक आयुक्तपदी नियुक्तीबद्दल बजरंग मोरे यांचा ग्रामपंचायत व पंडित नेहरू विद्यामंदिरतर्फे सत्कार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे,चंदगड प्रतिनिधी

श्री.बजरंग सूर्याजी मोरे यांची राज्यकर सहाय्यक आयुक्त (महाराष्ट्र राज्य) या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती झाल्याबद्दल वडगाव ग्रामपंचायत तसेच पंडित नेहरू विद्यामंदिर, वडगाव यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत श्री.मोरे यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल ग्रामस्थ, शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी व विविध मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या नियुक्तीमुळे वडगाव गावाच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या यशामुळे परिसरातील युवकांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते श्री. बजरंग सूर्याजी मोरे यांचा पुष्पगुच्छ व सत्कार करून पुढील शासकीय सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रामाणिकपणा, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी मिळविलेले हे यश कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

यावेळी तकाजगदिश मोरे, सतीश दिवटणकर, धनाजी नार्वेकर, गोविंद साबळे, लक्ष्मण शिंदे, सुधीर साबळे, संतोष साबळे, दीपक दिवटणकर, मयूर पाटील, नंदू शिंदे, प्रविण नार्वेकर, शरद दिवटणकर, नेताजी कांबळे, एकनाथ नार्वेकर, सुहास दिवटणकर, भगवान मोरे, श्रीधर साबळे, संभाजी चावरेकर, संतोष कांबळे, एकनाथ पाटील, दत्ता पाटील, रायगोंड पाटील, शिवाजी दिवटणकर, संजय आढाव, दीपक मोरे, राजू सुतार, सौरभ मोरे, शकील देसाई यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी श्री. बजरंग मोरे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या प्रशासकीय सेवेतून समाज व राज्याच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान घडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!