Edition

‘जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत’; तानाजी पाटील यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या सान्निध्यात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगर विद्यामंदिर येथे शाहूनगर, वाघोडे वसाहत, स्वामी शांतिप्रकाश नगर तसेच संपूर्ण प्रभाग क्रमांक ३च्या वतीने वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका मैत्राली खटावकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “मीही जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आहे. माझे वय वाढत असले तरी आज विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करताना मला माझे वय कमी झाल्यासारखे वाटले. शाळेच्या समस्या असतील तर त्या आवर्जून सांगत चला. जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मोहन माने, गुंडा वायदंडे, महादेव वायदंडे, अमित वायदंडे, बाबा ग्रुपचे अध्यक्ष आकाश ढेरे, रवी ढेरे, आबासाहेब माळी, शाम ठकराणी, मिरासाब कोलप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका मैत्राली खटावकर, शिक्षिका देवशाला मुंडे, अंगणवाडी सेविका नंदा सोनुले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शीतल कदम, पुष्पा नागावे, रूपाली माळी तसेच शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विशाल फुले यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच त्यांनी शाहूनगर विद्यामंदिरच्या विविध समस्या मान्यवरांच्या निदर्शनास आणून देत, शाळेच्या विकासासाठी सर्वांनी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहनही केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!