
गांधीनगर/प्रतिनिधी:उदय साळुंखे
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष (पूर्व) म्हणून गडमुशिंगेचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य जितेंद्र तानाजी यशवंत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, इचलकरंजी, शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असून, या बातमीने गडमुशिंगीसह परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून त्यांचे जोरदार स्वागत होत आहे.











