Edition

मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने भगवान श्री वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने भगवान श्री वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा आणि भव्य बागड मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.(बागड) निमित्त पुणे कॅम्प येथील पुलगेट पोलीस चौकी समोरील भगवान जहारवीर गोगादेव मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
पुणे कॅम्प परिसरातून विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली. येथील विविध भागांतील आखाड्याचे भगत निशाण घेऊन मिरवणुकीत सामील झाले होते. निशाणाला फुलांची आकर्षक सजावट करून मिरवणूक सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत सामील सर्व निशाणांचे श्रीफळ व निशाणाला फुलांची माळ टाकून स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी उत्सव समिती अध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सदस्य करण मकवाणी, उत्सव समारंभ अध्यक्ष डॉ, अनुपम बेगी, पुणे शहर मेहतर वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष रवी परदेशी, माजी नगरसेवक सुधीर जानज्योत,कविराज सं घेलिया,ॲड,श्याम चव्हाण,अर्जुन सोळंकी, शैलेंद्र जाधव, चेतन जेदे, कनव चव्हाण, मनोज पटेलिया चंद्रकांत चव्हाण मनू कागडा, योगेश चव्हाण, महेंद्र चव्हाण, कन्हैया संगेलिया, दीपक निनारिया, अशोक मेमजादे, सिद्धार्थ सारवान, रामलाल भगत, नितीन चव्हाण, मेघराज पवार, बिल्लू सारवान, सुनील पिवाल आदीउपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!