Edition

आधुनिक कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज – डॉ. महादेव शिंदे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, दर्जेदार अध्ययन साहित्य, स्वयं अध्ययन पद्धती आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या विविध संधींमुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची प्रतिमा मोठ्या प्रमाणात बदलली असून, विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार आधुनिक कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महावीर महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक डॉ. महादेव शिंदे यांनी केले.महावीर महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रात आयोजित उद्बोधन कार्यक्रमात तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. मुक्त विद्यापीठाची बदललेली प्रतिमा, त्याची विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या उज्ज्वल संधी या विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रातील मानसशास्त्र विषयाची विद्यार्थिनी आरगे प्रिया चंद्रकांत हिने बी.ए. मानसशास्त्र अभ्यासक्रमात विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. तिला कै. वेणुताई चव्हाण पारितोषिक आणि वंदना वसंत पुरोहित पारितोषिक अशी दोन पारितोषिके मिळाली. तसेच मेघा चव्हाण व साक्षी कलकूटकी यांचा विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेतील सहभागाबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी समंत्रक डॉ. तेजस्विनी भोसले यांना पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल, तसेच तेजस्विनी पाटील हिने विद्यापीठात गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
मुक्त विद्यापीठाच्या कार्यपद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत असून, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, स्वाध्याय व असाइनमेंट सादरीकरण विद्यापीठाची परीक्षा पद्धती व मूल्यमापनाबाबत विजयकुमार मुत्नाळे यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही अभ्यासकेंद्रासंदर्भात आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केंद्र संयोजक प्रा. जयवंत दळवी यांनी केले. आभार केंद्र सहाय्यक बसवराज वस्त्रद यांनी मानले.यावेळी प्राचार्य डॉ. प्रमोद लंबे, प्राचार्य डॉ. सोपान खाडे, डॉ. अंकुश बनसोडे, डॉ. शशिकांत अन्नदाते, प्रफुल्लकुमार पाटील, रुपेश हळदकर, सुरज हाडूळे, तसेच अभ्यासकेंद्राचे समंत्रक व विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विश्वास पाटील यांनी केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

माणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या सर्व चौकटी मोडून टाकणं ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी : हिंदुराव हुजरे-पाटील ———– आमदार प्रा. जयंत आसगावकर, डॉ. हरीश भालेराव नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

traffic tail

माणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या सर्व चौकटी मोडून टाकणं ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी : हिंदुराव हुजरे-पाटील ———– आमदार प्रा. जयंत आसगावकर, डॉ. हरीश भालेराव नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

error: Content is protected !!