Edition

बालमनावर सुसंस्कार व स्मरणशक्ती वाढीसाठी बसवेश्वर वचन पाठांतर स्पर्धा; डॉ. कल्याणजी कमते यांनी ६० वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज.

वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसून समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा संदेश देत चिकोडी तालुक्यातील सदलगा येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. कल्याणजी महादेव कमते यांनी आपला ६० वा वाढदिवस श्री महालिंग स्वामी कन्नड माध्यमिक प्रशालेत बसवेश्वर वचन पाठांतर स्पर्धा आयोजित करून अनोख्या पद्धतीने साजरा केला.

विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार व्हावेत, स्मरणशक्ती वाढावी आणि संत बसवेश्वरांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गीताश्रम मठाचे अधिपती डॉ. श्रद्धानंद स्वामीजी यांच्या हस्ते जगद्गुरू बसवेश्वर व अक्क महादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बसवेश्वर व अक्क महादेवी यांच्या वचनांच्या पाठांतर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुस्तक, पाटी, वह्या व अन्य शैक्षणिक साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला गीताश्रम मठाचे अधिपती डॉ. श्रद्धानंद स्वामीजी यांचे दिव्य सान्निध्य लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश देसाई होते, तर अरुण देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बब्रुवाहन कुगे, चंद्रकांत कुगे, सहाय्यक शिक्षिका शशिकला खोत, सुमाक्का मडीवाळ, रूपाली पाटील, मंजुळा कोल्हापुरे, विश्वगुरू बसव संघाचे अध्यक्ष नितीन देसाई, शालेय समितीचे सदस्य गुरुलिंग माने, रावसाहेब कुडचे, महेश हालापनावार, सामाजिक कार्यकर्ते राजू डांगे, राजू वाली, बंडा तपकिरे, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, शिरीष जगताप, रोहित संभोजे, राकेश पानके, गोपाल कमते यांच्यासह प्रशालेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी वाढदिवसानिमित्त सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. समाजोपयोगी उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याच्या डॉ. कल्याणजी कमते यांच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!