
यड्राव (प्रतिनिधी ) ः लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे दलीत शोषित उपेक्षित आणि वंचित घटकांचा आवाज आहे. त्यांनी या वर्गाच्या समस्या संघर्ष त्यांग आणि स्वाभिमान त्यांनी साहित्यातून दाखवून दिला त्यामुळे त्याचे साहित्य हे इथल्या शोषित वर्गाचा आवाज म्हनून दिसून येते, व त्याचे प्रतिबंब त्यातून उमटते. असे प्रतिपादन ॲड. ममतेश आवळे यांनी केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती नरंदे येथे समस्त बौद्ध-मातंग समाज यांच्या वतीने घेण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरंदे गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच पुजा कुरणे,उपसरपंच मयुरी भोरे (वहिनी), ग्रामसेवक चंद्रकांत जाधव, माजी सरपंच रविंद्र अनुसे, माजी पंचायत समिती उपसभापती राजकुमार भोसले, ग्रामपंचायत सदस्य दत्ता भंडारी, आमिर मुलानी, सीमा भंडारी, बबलू पाटील, तसेच समस्त बौद्ध-मातंग समाज मधील समाजबांधव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची पर्यावरण पूरक जयंती साजरी करण्याचे हेतूने 40 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमर दबडे, अंकुश सर्वगोडे , प्रकाश भोरे , विवेक भोरे, अभी दबडे, अल्लाउद्दीन बेपारी, अभिजीत आवळे, आशिष जाधव, युवराज कांबळे, सुशांत जाधव,
किसन भोरे, अनिकेत भोरे, सुशांत दबडे, विशाल घाटगे, प्रमोद बनसोडे, सुकुमार जाधव, नंदकुमार भोरे, विकास भोरे, आशिष भोरे, आदित्य भोरे, ऋषिकेश भोरे, आदी समाजबांधवांनी कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा होण्यासाठी प्रयत्न केले.
सदर कार्यक्रमांचे सूत्रसंचलन ॲड.अंकुश सर्वगोडे यांनी केले, तर किसन भोरे यांनी आभार मांडले. यड्रावहून उत्तम जगताप.











