Edition

ऊसदरासाठी राजू शेट्टींची उद्या आष्ट्यातून मोटारसायकल रॅली! ‘दर निश्चित होईपर्यंत ऊसतोड करू नका’; शेतकऱ्यांना जनजागृतीत सहभागी होण्याचे आवाहन..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढवावी, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने उद्या, रविवार (ता. १८ ऑक्टोबर) रोजी सकाळी ११ वाजता आष्टा येथून मोटारसायकल जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.
ही रॅली आष्टा येथून सुरू होऊन सोनहिरा, क्रांती आणि कृष्णा साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातून जाणार आहे. या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून ऊसदर निश्चित होईपर्यंत शेतातील ऊस शेतातच ठेवण्याचे, तसेच ऊसतोड घेऊ नये, असे आवाहन करण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, सरकारने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) निश्चित करून त्यात वाढ करणे आवश्यक आहे. सरकार आणि साखर कारखानदारांकडून ऊसदराचा ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना उसाचा योग्य दर मिळणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजुटीने आपल्या मागण्यांसाठी ठाम भूमिका घ्यावी.
ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत ऊसतोड घेऊ नका, अशी विनंती करण्यासाठी ही जनजागृती रॅली काढण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचा ऊस आहे, त्या सर्वांनी मोठ्या संख्येने मोटारसायकल रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिंचवाड गावच्या विकासासाठी आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी कटिबद्ध : सरपंच श्रद्धा पोद्दार विकासकामांत अडथळा आणणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणार; ग्रामपंचायत प्रशासनाकडून बदनामी करणाऱ्यांना कडक इशारा

traffic tail

चिंचवाड गावच्या विकासासाठी आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी कटिबद्ध : सरपंच श्रद्धा पोद्दार विकासकामांत अडथळा आणणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणार; ग्रामपंचायत प्रशासनाकडून बदनामी करणाऱ्यांना कडक इशारा

error: Content is protected !!