सदलगा, प्रतिनिधी – अनिलकुमार डेक्कण्णवर,
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सदलगा शहरातील ए-1 फायनान्स कॉर्पोरेशन (रि.) ने सामाजिक बांधिलकी जपत एक आगळा वेगळा उपक्रम राबवला.
संस्थेच्या संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली ए-1 फायनान्स कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात संस्थेचे कामगार व पिग्मी ठेवीदारांना दिवाळी भेट म्हणून ताट व ग्लासचे वाटप करण्यात आले.
यावेळी सुमारे 250 जणांना भेटवस्तू देऊन सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
*यावेळी उपस्थित मान्यवर :*
संस्थापक सुनील संद्रे, अध्यक्ष अमोल करंगळे, उपाध्यक्ष शिवाजी सपकाळे, चिदानंद मुतनाळे, सुदर्शन सुतार, महादेव सातपुते, विक्रम केस्ती, संतोष वास्कर, निलेश वळकुंडे, अय्युब मुल्ला, कल्लाप्पा कुंभार, अब्बास मकानदार, अनिल नंदे, बाबासाहेब करंगळे, संतोष गोटे, आशिष पिसाळ, विकास चौगले तसेच कायदेशीर सल्लागार शिवानंद करंगळे आदी उपस्थित होते.
दिवाळीनिमित्त कामगार व ठेवीदारांचा सन्मान करून भेटवस्तू दिल्याबद्दल संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.










