सदलगा, दि. 05
वार्ताहर : अनिलकुमार डेक्कण्णवर,
कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या दराबाबत अखेर अंतिम करार झाला आहे. यामुळे बेळगाव, बागलकोट, विजापूरसह संपूर्ण कर्नाटकातील ऊस शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
*करारातील ठळक मुद्दे :*
*1. पहिला हप्ता :* प्रति टनाला *₹3500* पावती
*2. दुसरा हप्ता :* हंगाम संपल्यानंतर प्रति टनाला *₹100* अतिरिक्त
*3. अंतिम हप्ता :* नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेचा सरासरी विक्री दर प्रति किलो *₹45* पेक्षा जास्त झाल्यास त्यानुसार दर वाढणार.
साखरेचा सरासरी दर (प्रति किलो) प्रति टन ऊस दर
₹48 ₹3650
₹49 ₹3750
₹50 ₹3850
₹55 ₹4350
या दरातून आधीच दिलेले ₹3600 वजा करून उरलेल्या अतिरिक्त रकमेतील *75% रक्कम शेतकऱ्यांना* आणि *25% रक्कम साखर कारखान्यांना* मिळणार आहे.
कर्नाटकातील शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून उसाला योग्य दर मिळावा, यासाठी आंदोलन केले होते. अखेर या करारामुळे शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले आहे.
या निर्णयाचे कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे.










