Edition

गोकुळच्या लढ्याला राहुल गांधींचे बळ; सतेज पाटलांची मोठी घोषणा, ‘कोर्टातही लढू अन् रस्त्यावरही!’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर : प्रतिनिधी –
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्ष आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. गोकुळमध्ये चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणात आमदार सतेज पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकत महायुतीला १२ जागांवर रोखले होते. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेले १४ संचालकांचे संख्याबळ आणि कोरमअभावी निवड प्रक्रिया रखडली. त्यातच राज्य सरकारने चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून भाजपवर निशाणा साधताना निवडणुकीनंतर नियम बदलून चार संचालकांची नियुक्ती करणे म्हणजे दूध उत्पादकांच्या मतांचा अपहार आणि जनादेशात भेसळ असल्याची टीका केली. सत्ता टिकवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

इचलकरंजी येथे 15 नोव्हेंबर रोजी कोळी समाजाचा भव्यवधू-वर पालक परिचय मेळावा.मधुस्वप्न’ सूचक केंद्राच्या वतीने चौथ्या मेळाव्याचे आयोजन; महाराष्ट्र व कर्नाटकातील समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन.

traffic tail

इचलकरंजी येथे 15 नोव्हेंबर रोजी कोळी समाजाचा भव्यवधू-वर पालक परिचय मेळावा.मधुस्वप्न’ सूचक केंद्राच्या वतीने चौथ्या मेळाव्याचे आयोजन; महाराष्ट्र व कर्नाटकातील समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन.

error: Content is protected !!