Edition

इचलकरंजी येथे 15 नोव्हेंबर रोजी कोळी समाजाचा भव्यवधू-वर पालक परिचय मेळावा.मधुस्वप्न’ सूचक केंद्राच्या वतीने चौथ्या मेळाव्याचे आयोजन; महाराष्ट्र व कर्नाटकातील समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने चिकोडी.

इचलकरंजी : “ना पैशासाठी, ना नावासाठी, हा मेळावा फक्त समाजासाठी…” या उदात्त विचाराला प्राधान्य देत महाराष्ट्रासह कर्नाटक परिसरातील तमाम कोळी समाजबांधवांसाठी इचलकरंजी येथे भव्य वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इचलकरंजी येथील ‘मधुस्वप्न’ कोळी समाज वधू-वर सूचक केंद्राच्या वतीने रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी चौथ्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शशिकांत मधुकर कोळी यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विवाहयोग्य मुला-मुलींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच पालकांना एकमेकांशी परिचय करून देत विवाह जुळविण्याची प्रक्रिया सुलभ करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

आजच्या काळात विवाह जुळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजातील उपवर तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांना एकाच ठिकाणी भेटण्याची संधी मिळावी, तसेच योग्य स्थळांची माहिती उपलब्ध व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून ‘मधुस्वप्न’ सूचक केंद्राने हा उपक्रम हाती घेतला आहे.

मेळाव्याचे ठिकाण व वेळ :

रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता नावनोंदणी सुरू होणार असून, दुपारी ठीक २.३० वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे.

हा मेळावा रोटरी श्री दगडुलाल मर्दा मानव सेवा केंद्र, रिंगरोड, निरामय हॉस्पिटलजवळ, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

आवश्यक कागदपत्रे व सूचना :

मेळाव्यात सहभागी होणाऱ्या वधू किंवा वराने आपला संपूर्ण बायोडाटा आणि ४ x ६ आकाराचा फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच मेळाव्यात विवाहयोग्य वधू-वरांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

संचालक शशिकांत मधुकर कोळी, सांगली रोड, सांगली नाका, बालाजी बेकरीमागे, पाण्याच्या टाकीजवळ, इचलकरंजी.

मोबाईल क्रमांक : ८९७५६३४३५०

महाराष्ट्र आणि कर्नाटक परिसरातील समस्त कोळी समाजबांधवांनी आपल्या विवाहयोग्य मुला-मुलींसह पालकांनी या चौथ्या भव्य वधू-वर परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि या सामाजिक उपक्रमाला सहकार्य करून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन ‘मधुस्वप्न’ कोळी समाज वधू-वर सूचक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

इचलकरंजी येथे 15 नोव्हेंबर रोजी कोळी समाजाचा भव्यवधू-वर पालक परिचय मेळावा.मधुस्वप्न’ सूचक केंद्राच्या वतीने चौथ्या मेळाव्याचे आयोजन; महाराष्ट्र व कर्नाटकातील समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन.

traffic tail

इचलकरंजी येथे 15 नोव्हेंबर रोजी कोळी समाजाचा भव्यवधू-वर पालक परिचय मेळावा.मधुस्वप्न’ सूचक केंद्राच्या वतीने चौथ्या मेळाव्याचे आयोजन; महाराष्ट्र व कर्नाटकातील समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन.

error: Content is protected !!