Edition

सागावात स्वाभिमानीच्या ऊस आंदोलनाची यशस्वी सांगता – सरपंच सौ. अस्मिता रवी पाटील यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा सन्मान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सागाव, ता. शिराळा, दि. ६ – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस दरवाढ आंदोलन आज पहिला हप्ता ३९००/- रुपये व नंतर १००/- रुपये वाढ या निर्णयाने येथे समाप्त झाले.या आंदोलनाच्या यशस्वितेबद्दल सागावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. अस्मिता रवी पाटील यांनी स्वाभिमानीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
गेल्या चार वर्षांपासून सत्तेवर असताना सरपंच सौ अस्मिता पाटील या नेहमी शेतकऱ्यांच्या बरोबर राहिल्या आहेत.मागे देखील त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनकर्त्यांच्या सोबत ठाण मांडले होते.
दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सरपंचांच्या पुढाकाराने गावातील शेतकरी, तोडणी मजूर, कंत्राटदार, ट्रॅक्टर मालक व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसोबत समन्वय बैठक घेऊन 25 ऑक्टोबर पर्यंत ऊस न तोडण्याचा ठराव केला होता. त्याचे तंतोतंत पालन झाले. याच ठरावाचा आदर्श घेऊन पुढे सरूड, कांदे येथे ठराव होऊन शिराळा आणि शाहूवाडी तालुक्यात बऱ्यापैकी ऊस तोडी बंद राहिल्या.
आज औषध खताचे दर, मजुरांचे पगार, वाढल्याने ऊस शेती परवडत नाही. त्यामुळे पहिला हप्ता साडेचार हजार मिळाला पाहिजे ही संघटनेची भूमिका होती. शेतकऱ्याला दर मिळाला तरच गावची बाजारपेठ फुलणार आहे, व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढणार आहे. आज शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण घ्यायचे असेल तर कर्जाशिवाय पर्याय नाही. याला शेतमालाचे पडलेले दर आणि निर्यातबंदी जबाबदार आहे. राजकीय लोक या प्रश्नावर चार हात लांब असतात,पण सरपंच सौ.पाटील यांनी ग्रामपंचायत, ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने आपण ऋणी असल्याची कृतज्ञता व्यक्त करून स्वाभिमानीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा सन्मान केला.
यावेळी स्वाभिमानीचे केरू नाकील,शिवलिंग शेटे,संपत पाटील,विष्णू पवार,दादा पाटील,चंद्रकांत पाटील,शंकर घोलप,कृष्णात वंडकर, तसेच कणदूर चे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब शेटे,अशोक दादा पाटील,नाना पाटील,अरुण पाटील सर,दादा जाधव,नाना गायकवाड,महादेव संकपाळ,तुषार कांबळे सर,कृष्णात पाटील आदी प्रमुख शेतकरी उपस्थित होते. सुरुवातीला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

इचलकरंजी येथे 15 नोव्हेंबर रोजी कोळी समाजाचा भव्यवधू-वर पालक परिचय मेळावा.मधुस्वप्न’ सूचक केंद्राच्या वतीने चौथ्या मेळाव्याचे आयोजन; महाराष्ट्र व कर्नाटकातील समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन.

traffic tail
error: Content is protected !!