Edition

शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळवण्यासाठी ईश्वरपुरात भव्य मशाल मोर्चा!. ऊस दरवाढीसाठी शेतकरी रस्त्यावर; पंचायत समितीपासून मोर्चाला सुरुवात.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला योग्य आणि रास्त दर मिळावा, या न्याय्य मागणीसाठी ईश्वरपूर येथे आज, शुक्रवार (दि. ६ नोव्हेंबर) रोजी भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोर्चाला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती, ईश्वरपूर येथून सुरुवात झाली. हातात पेटत्या मशाली घेऊन मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले.
ऊस दरवाढीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना शेतकऱ्यांमध्ये साखर कारखानदारांच्या धोरणांविरोधात नाराजी वाढत आहे. उसाच्या उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, मजुरी, खते, औषधे आणि वाहतूक खर्च यांचा विचार करता सध्याचा ऊस दर परवडणारा नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत उसाला रास्त भाव मिळावा आणि ऊस उत्पादकांच्या न्याय्य मागण्यांकडे शासन व साखर कारखानदारांचे लक्ष वेधले जावे, या उद्देशाने मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
पेटत्या मशालींच्या प्रकाशात निघालेल्या या मोर्चातून ऊस दरवाढीच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!