Edition

शिरगुप्पी शुगर वर्क्स लि., कागवाड कडून ऊस दर जाहीर पहिला हप्ता ₹3700, एकूण दर ₹4000 प्रति मेट्रिक टन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वार्तांकन : अनिलकुमार डेक्कण्णवर, सदलगा*

सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, आमच्या साखर कारखान्याचे गळीत हंगाम 2026-27 प्रारंभ केले आहे, असे शिरगुप्पी शुगर वर्क्स लिमिटेड, कागवाड यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

कार्यक्षेत्रामध्ये कमी पडलेले पाऊस, सध्याची ऊस पिक परिस्थिती, निघणारे टनेज या सर्व परिस्थितींचा व वस्तुस्थितींचा विचार करून कारखान्याच्या मा. संचालक मंडळ यांनी खालील प्रमाणे ऊस दर देण्याचे निर्णय घेतलेला आहे.

*जाहीर केलेला ऊस दर :*

*1.* ऊसाचा पहिला हप्ता – *रु. 3,700/- प्रति मेट्रिक टन*
*2.* ऊसाचा दुसरा हप्ता हंगाम समाप्ती नंतर – *रु. 100/- प्रति मेट्रिक टन*
*3.* ऊसाचा तिसरा हप्ता साखरेचे विक्री दर 50 रु. असल्यास पुढील हंगाम सुरुवात होण्या आधी – *रु. 200/- प्रति मेट्रिक टन*

*असे एकूण गळीत हंगाम 2026-27 साठी ऊस दर रु. 4,000/- प्रति मेट्रिक टन राहील.*

तरी सन 2026-27 च्या गळीत हंगामामध्ये सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला जास्तीत जास्त ऊस आमच्या कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे, ही विनंती करण्यात आली आहे.

सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

*श्री. कल्लाप्पण्णा पा. मगेण्णवर Ex.M.L.A*
*संस्थापक चेअरमन*
*शिरगुप्पी शुगर वर्क्स लि., कागवाड*

या निर्णयामुळे कागवाड परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!