गांधीनगर: प्रतिनिधी
उदय साळुंखे
(कोल्हापूर):
“शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते,” याच ब्रीदवाक्याला जागून गांधीनगरमधील महोबा माळ परिसरात दहशत माजवणाऱ्या आकाश वायदंडे याच्या मुसक्या आवळण्यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक पवित्रा घेतला आहे. या विकृत आणि सनकी व्यक्तीच्या त्रासातून नागरिकांना कायमची मुक्ती मिळावी, यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास कोडग, ग्रामपंचायत सरपंच संदीप पाटोळे आणि ग्रामसेवक पाटील यांना शिवसेना व स्थानिक नागरिकांनी संयुक्त निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
नेमका प्रकार काय?
महोबा माळ परिसरात राहणारा आकाश वायदंडे हा नग्न फिरणे, महिला व शाळकरी मुलींची छेड काढणे, स्थानिक व्यावसायिकांच्या दुकानांत जाऊन फुकट खाणे आणि पैसे मागितल्यावर शिवीगाळ करणे, अशी कृत्ये करून सामाजिक शांतता भंग करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या त्रासाला कंटाळून कुणी त्याला जाब विचारला किंवा चोप दिला, तर त्याचे नातेवाईक उलट नागरिकांवरच पोलीस तक्रार करून त्याला पाठीशी घालत आहेत.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या:
१. आकाश वायदंडे हा खरोखर मनोरूग्ण असल्यास त्याला तातडीने मानसिक रुग्णालयात दाखल करून उपचार करावेत.
२. तो जर जाणीवपूर्वक सनकीपणा आणि गुंडागर्दी करत असेल, तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
৩. गुन्हेगाराला पाठीशी घालणाऱ्या त्याच्या नातेवाईकांना पोलिसांनी सक्त ताकीद द्यावी.
यांच्या नेतृत्वाखाली दिले निवेदन:
हे निवेदन शिवसेना कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख समन्वयक श्री. विक्रम (बापू) चौगुले आणि ग्राहक संरक्षण तालुका प्रमुख श्री. जितेंद्र कुबडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी उपशहरप्रमुख दीपक पोपटानी (अंकल), कृष्णात हेगडे, सचिन माने, धनंजय पाटील, संजय काळुगडे, आप्पा कांबळे, अनिल हेगडे, टिपू वायदंडे, दिलीप थोरात, विनोद रोहडा, विभाग प्रमुख वीरेंद्र भोपळे, शफीभाई शेख यांच्यासह महिला आघाडीच्या सुनिता जिरंगे, सपुरा सोलापूरे, प्रज्ञावती हेगडे, समिना जमादार तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.










