विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.
ढोणेवाडी ता.चिकोडी येथील श्री.मल्लिकार्जुन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.,मलिकवाड या संस्थेच्या ढोणेवाडी शाखेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त शाखेत सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. श्री.प्रशांत श्रीपाल मेक्कळके या दाम्पत्याच्या हस्ते सत्यनारायण पूजा विधिवत संपन्न झाली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अण्णासो धोंडीराम इंगळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ढोणेवाडी शाखेने पाच वर्षांच्या कालावधीत उल्लेखनीय प्रगती केली आहे.
शाखेकडे सध्या जवळपास चार कोटी रुपयांच्या ठेवी असून, सुमारे दीड कोटी रुपयांचे कर्जवितरण करण्यात आले आहे. शाखा सध्या स्वमालकीच्या इमारतीत कार्यरत असून, आगामी काळात संस्थेची अधिक भरभराट व्हावी, यासाठी शाखेचे संचालक मंडळ आणि सर्वजण प्रयत्नशील आहेत.
संस्थेमार्फत सभासदांसाठी विविध प्रकारच्या कर्जयोजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सभासदांनी या कर्जसुविधांचा योग्य प्रकारे लाभ घ्यावा आणि संस्थेच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे, असे आवाहनही संस्थापक अध्यक्ष श्री.अण्णासो धोंडीराम इंगळे यांनी यावेळी केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास शाखाध्यक्ष श्री. अरविंद हिरीकुडे सर,उपाध्यक्ष श्री.अजित नागराळे, संचालक महंतेश सदलगे, प्रशांत मेक्कळके
रावसाहेब माळी, बाबासाब खोत, उदय घाटगे, मारुती गावडे, दत्ता संकपाळ, राजश्री बुडके, भागेश नरबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच मुख्य शाखेचे राजशेखर बाकळे, संचालक अक्षय इंगळे, पांडुरंग ठोंबरे सर, सारिका पाटील, शाखा व्यवस्थापक अभिषेक पाटील आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने धार्मिक वातावरणात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. शाखेने पाच वर्षांत केलेली प्रगती आणि सभासदांचा मिळालेला विश्वास याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. आगामी काळातही सभासदांना उत्तम सेवा देत संस्थेच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.










