Edition

काडापूर येथील रहिवासी आप्पांना तानाजी माळी याचा वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी निधन; आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा काळाच्या पडद्याआड;काडापूर परिसरात हळहळ.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.

काडापूर, (ता.चिकोडी ) येथील रहिवासी आप्पांना तानाजी माळी याचा सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी दुःखद निधन झाले.

त्याच्या अकाली निधनाच्या वृत्ताने काडापूर गावासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आप्पांना तानाजी माळी हे सुमारे एक महिन्यापूर्वी वाहन घसरून झालेल्या अपघातात जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याने माळी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आप्पांना तानाजी माळी हे आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. तरुण वयातच त्यांची जीवनयात्रा संपल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

ज्या वयात आयुष्याची नवी स्वप्ने पाहायची, भविष्य घडवायचे आणि कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करायच्या असतात, त्याच वयात त्यांचे निधन झाल्याने नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमधून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

एसआयआर अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 99.94 काम पूर्ण बिनचूक मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – एसआयआर कामकाज, पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा

traffic tail

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

error: Content is protected !!