ईश्वरपूर प्रतिनिधी – चालू गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसदराच्या प्रश्नावरून वाळवा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. उसाला प्रति टन पाच हजार पाचशे रुपये पहिली उचल मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.
य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना शिवनगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडविले. यावेळी ४० हुन ऊसाचे भरलेले रोखून धरत सहा ते सात बैलगाडी मधील हवा सोडण्यात आली. ऊस वाहतूक करणारी वाहने थांबवून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
कृष्णा सहकारी साखर कारखाने गळीत हंगाम सुरू केला आहे. ऊसदराचा प्रश्न निकाली निघेपर्यंत कारखाना सुरू करू नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे केली होती. मात्र कारखाना प्रशासनाने संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करून गळीत हंगाम सुरू ठेवल्याने कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखल्याचे संघटनेने सांगितले.कृष्णा नदीवरील
बहे पुल सुमारे४०/५० ट्रॅक्टरमधील भरलेल्या उसाची वाहतूक रोखण्यात आली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळाल्याशिवाय कारखान्यांचा गळीत हंगाम सुरळीत चालू देणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.
उसाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रति टन पाच हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला.
दरम्यान, साखरेला बाजारात चांगला दर मिळत असताना ऊस उत्पादकांना योग्य दर देण्याबाबत साखर कारखानदारांकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे चालू गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव, सतोष शेळके,प्रदीप नागरे, प्रताप पाटील,शहाजी पाटील,बळीराजा गणेश शेवाळे, दत्तात्रेय जाधव, बळीराजा शेतकरी सघटनेचे गणेश शेवाळे, रामचंद्र देवकुळे,कृष्णा कुभार सह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- चौकट…यंदा देशात साखरेची टंचाई आहे दसरा दिवाळी साखरेचा भाव शंभरच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. पर्जन्यमान कमी असल्याने उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात कारखानदार शेतकऱ्यांच्या दारात ऊसतोडीसाठी येतील. “तुमच्या उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ;५५०० रुपयेचा निर्णय होईपर्यंत साखर कारखाने चालू होऊन देणार नाही ,”
भागवत जाधव
नेते स्वाभिमानी शेतकरी सघटना










