Edition

वाशिम येथे शिवसेना सोशल मीडिया पश्चिम विदर्भ टीमची मॅरेथॉन बैठक संपन्न. प्रतीकदादा शर्मा यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन; संघटनात्मक कामकाज आणि डिजिटल माध्यमांच्या प्रभावी वापरावर चर्चा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी : संतोष भालेराव
वाशिम : येथील हॉटेल दानिश एम्पायर येथे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी शिवसेना सोशल मीडिया पश्चिम विदर्भ टीमची मॅरेथॉन बैठक उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. श्री. एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना सोशल मीडिया उपराज्यप्रमुख मा. श्री. प्रतीकदादा शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
पदाधिकाऱ्यांच्या समस्या ऐकून घेत प्रतीकदादा शर्मा यांचे मार्गदर्शन
या बैठकीत शिवसेना सोशल मीडिया उपराज्यप्रमुख मा. श्री. प्रतीकदादा शर्मा यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेत त्यावर योग्य मार्गदर्शन केले. शिवसेनेचे संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावी करण्यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पक्षाची भूमिका, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पश्चिम विदर्भातील नागरिकांचे स्थानिक प्रश्न, जनतेच्या समस्या आणि सोशल मीडिया यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेत पक्षाचे विचार आणि कार्य तळागाळातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी अधिक सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
या बैठकीला शिवसेना सोशल मीडिया पश्चिम विदर्भ प्रमुख श्री. सचिनजी व्यास, श्री. महादेवदादा सलकडे, श्री. समीरदादा चिकले, तसेच शिवसेना सोशल मीडिया रिसोड विधानसभा समन्वयक संतोष भालेराव यांच्यासह बुलढाणा, वाशिम, अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांतील शिवसेना सोशल मीडिया पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविणे, शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देणे, नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे आणि संघटनात्मक कामकाजाला डिजिटल माध्यमांची जोड देणे याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
डिजिटल माध्यमांतून संघटन बळकटीकरणावर भर
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे जनतेशी थेट संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. या माध्यमाचा योग्य वापर करून शिवसेनेचे कार्य, विकासकामे आणि जनहिताचे उपक्रम समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
पश्चिम विदर्भात शिवसेना सोशल मीडिया संघटना अधिक सक्षम करणे, पदाधिकाऱ्यांमधील समन्वय वाढविणे आणि जनतेच्या प्रश्नांना डिजिटल माध्यमांतून प्रभावीपणे वाचा फोडणे, या दृष्टीने ही मॅरेथॉन बैठक महत्त्वपूर्ण ठरली

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

traffic tail

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

error: Content is protected !!