शिंगणापूर, प्रतिनिधी – ता.११ : शिंगणापूर मुख्य मार्गावरील ‘खांडसरी नाका’ परिसरात शनिवारी (ता.१०) मध्यरात्री सतीश तानाजी पाटील (वय ३६, रा. हणमंतवाडी, ता. करवीर) या तरुणाला बिबट्याचे दर्शन झाले.
प्रत्यक्षदर्शी ने सांगितलेल्या घटनेवरून मिळालेली अधिक माहिती अशी, पाटील हे त्यांचे मोठे बंधू हर्षद पाटील यांच्यासोबत ट्रॅक्टर मधून रात्री त्यांच्या घरी हणमंतवाडी कडे परतत होते. ‘खांडसरी नाका’ पासून पुढे गेल्यावर ‘योगेश माने’ यांच्या ट्रेडर्स गोडावून परिसरात बिबट्या ने त्यांच्या ट्रॅक्टर समोरून ट्रेडर्स गोडावून च्या पिछाडिस असलेल्या शेतात उडी मारल्याचे प्रत्यक्ष पाहिले. तसेच शिंगणापूर मार्गावरील ‘दत्तनगर’ मधील काही महिला पहाटे ४ च्या सुमारास फिरायला गेल्या असता ‘चंबुखडी टाकी’ परिसरात बिबट्या दिसल्याचा त्यांच्याकडून दावा करण्यात आला आहे. बिबट्या पुन्हा ‘लक्षतीर्थ वसाहत – फुलेवाडी’ च्या दिशेने वेगाने गेल्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभाग कडून करण्यात आले आहे.
*प्रतिक्रिया*
बिबट्याच्या शोधासाठी तत्काळ टिम ला पाचारण करण्याच्या सूचना देत देत आहे. ड्रोन च्या सहाय्याने परिसरात बिबट्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
आप्पासाहेब बुरटे, वनपाल, करवीर










