Edition

सेलूत गणेशोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

व्याख्यानमालेचे हे 65 वे वर्ष.

सेलू : गेल्या ६४ वर्षापासून सेलू शहरात गणेशोत्सवात गणेशोत्सव व्याख्यानमाला चालवली जाते. यामध्ये अनेक नामवंत व अभ्यासू व्यक्तींनी आतापर्यंत सहभाग घेऊन व्याख्याने दिली आहेत. हे या व्याख्यानमालेचे ६५ वे वर्ष असून दि २१ ते २४ कालावधीत दररोज सायंकाळी ६ वाजता नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यामध्ये दि. २१ सप्टेंबर रोजी पद्मश्री नारायन सुर्वे आधुनिक साहित्यातले कबीर या विषयावर यशवंत महाविद्यालय नांदेड येथील प्रा. डॉ. विश्वाधार देशमुख हे व्याख्यान देणार आहेत. यावेळी नूतन महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजाराम झोडगे हे अध्यक्ष स्थान भूषवणार आहेत. तर संयोजक म्हणून प्रा.डॉ. अशोक पाठक , भगवान देवकते व मोहन खापरखुंटीकर आहेत. दि २२ सप्टेंबर रोजी गजानन कृपा कोचिंग क्लास चे संचालक संतोष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या मुलांची बदलती मानसिकता या विषयावर डॉ. सुबोध माकोडे, सौ अस्मिता मोरे, शशिकांत देशपांडे,रामकिशन सोळंके, प्रवीण सोनोने, चि. जय चौधरी व कु सानवी हेलसकर हे विचार व्यक्त करणार आहेत. दि २३ सप्टेंबर रोजी योगशिक्षक डी. डी. सोन्नेकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. चारुशीला जवादे (परभणी) यांचे श्वासाचे महत्व आणि ओंकार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दि २४ सप्टेंबर रोजी माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या अध्यक्षतेखाली आशा – सुमन (स्वरांजली) या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. व यामध्ये स्थानिक गायक व कलावंत सहभाग घेणार आहेत तरी सर्व रसिक श्रोत्यांनी या व्याख्यान मालेस उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!